शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

कामबंद आंदोलनात संगमेश्वर कोतवाल संघटना सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:27 IST

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद सुरू केले आहे.

देवरूख : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद सुरू केले आहे. संगमेश्वर तालुक्यातील सर्व कोतवाल या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत.

महसूल विभागात २४ तास काम करणारा कर्मचारी म्हणून कोतवाल सर्वांच्या परिचयाचा आहे. गाव, तहसील, एसडीओ आॅफिस, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सदैव कोतवाल काम करत असतो. सुमारे ४० वर्षांपासून कोतवाल चतुर्थ श्रेणीसाठी लढत आहे. आजपर्यंत शेकडो आंदोलने झाली उपोषणे केली. पायी वर्धा ते नागपूर, नाशिक ते मुंबई अशी आंदोलने केली पण सरकारने अजून त्यांना न्याय दिला नाही. शेवटचा लढा म्हणून कोतवाल कामबंद आंदोलन करत आहेत. जोपर्यंत चतुर्थ श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत कोतवाल कामबंद आंदोलन सुरू ठेवणार असा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने लवकरात लवकर कोतवाल यांच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्ते यांनी घेतला आहे.

या आंदोलनासाठी आतापर्यंत अनेक शासकीय कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये विदर्भ पटवारी संघ नागपूर, तृतीय श्रेणी कर्मचारी महाराष्ट्र राज्य, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महाराष्ट्र राज्य या संघटनांनी कोतवाल यांची चतुर्थ श्रेणीची मागणी रास्त असून त्यांचा सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्या असे म्हटले आहे. दोन दिवसात चतुर्थ श्रेणी अहवालावर स्वाक्षरी करून आमचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्ही सर्व महाराष्ट्रातील  कोतवाल कामबंद आंदोलन अधिक तीव्र करण्यात आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे.

टॅग्स :StrikeसंपRatnagiriरत्नागिरी